पुण्यामधील विश्वजबाग येथील
जगातील सर्वात मोठ्या स्थानिक एमआयटी कॅम्पसमध्ये हिंदू, मुस्लिम, सिख, ख्रिश्चन, यहूदी, बौद्ध यांसारख्या अनेक
धर्मांच्या धर्मगुरुंनी एकत्रित येऊन विशेषतः आयोजित करण्यात आलेल्या पवित्र
यज्ञात सहभाग घेतला आणि श्रीमद भगवत गीता ध्यान भवनाचे उद्घाटन केले.
Inauguration ceremony of Shrimad Bhagwad Gita Dnyan Bhavan, MIT Pune. |
पुण्यातील विश्वराजबाग येथे
एमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, एमआईटी एडीटी युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि जगातील सर्वांत मोठा
डोम-संत श्री ज्ञानेश्वर विश्व शांति प्रार्थना कक्ष स्थापित आहे. याच परिसरात
आणखीन एक ऐतिहासिक घटना घडली आहे. येथील श्रीमद भगवत गीता ध्यान भवनाच्या
उद्घाटनानंतर विश्वराजबाग पुन्हा एकदा जागतिक शांतता, अध्यात्म आणि विज्ञान यांचा
एक अद्वितीय संगम आहे.
एकाम सती विप्र बहाद
वेदांतीच्या भारतीय संकल्पनांच्या आधारे याचा अर्थ असा आहे की, जरी ज्ञानी पुरुष
वेगवेगळ्या नावांनी बोलत असले तरीही सत्य केवळ एकच आहे. या पवित्र यज्ञासाठी हिंदू, मुसलमान, सिख, ख्रिस्ती, बौद्ध, यहुदी आणि इतर अनेक
धर्मांचे धर्मगुरू मानवजातीच्या ऐक्य आणि शांततेत सहभागी झाले.
Dr. Vishwanath D. Karad brings together heads of different religions who inaugurate the ceremony of Shrimad Bhagwad Gita Dnyan Bhavan, MIT Pune. |
या खास मुहूर्तावर पद्म
विभूषण डॉ. के. एच संचेती, प्रख्यात ऑर्थोपेडिक आरिफ़ मोहम्मद खान, पूर्व केंद्रीय मंत्री डॉ.
फ़िरोज़ बख़्त अहमद, मौलाना अबुल कलाम आज़ाद उर्दू यूनिवर्सिटी (हैदराबाद) चे कुलगुरू डॉ.
बुधाजीराव मुलिक, प्रख्यात कृषि विशेषज्ञ कलम किशोर कदम, महाराष्ट्र चे पूर्व शिक्षा मंत्री
दिलीप देशमुख, पुण्याचे जॉईंट चॅरिटी कमिश्नर विट्ठलराव जाधव, पूर्व संसद आणि नामवंत शिक्षाविशेषज्ञ
श्रीपाल सबनीस, मराठी साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष आणि शिक्षाविशेषज्ञ प्रतापराव बोराडे हे देखील ह्या कार्यक्रमात सहभागी
झाले.
एच. एच. श्रीकृष्ण कर्वे
गुरुजी, पंडित वसंतराव गाडगीळ, स्पाइसर यूनिवर्सिटी चे डॉ. संजीव अरसुड, भांटे नागा घोष, ज्ञानी अमरजीत सिंह, डॉ. आर. एन. शुक्ला, रामेश्वर शास्त्री, डॉ. मेहर मास्टर मूस, डॉ. इसाक मालेकर यांनी ह्या
कार्यक्रमाचे खास पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली.
उच्च शिक्षाविशेषज्ञ, यूनेस्को चे सदस्य आणि
वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे अध्यक्ष विश्वनाथ डी. कराड म्हणाले की, "१९व्या शतकात स्वामी विवेकानंद
म्हणाले होते की, २१व्या शतकातात भारत जगभरात विज्ञानाचे प्रमुख केंद्र
म्हणून ओळखले जाईल. तसेच शांती आणि आनंदचा मार्ग दाखवत भारताची गणती विश्वगुरूच्या
स्वरूपात होईल. अश्या वेळी श्रीमद भगवत गीता ध्यान भवनाचे अनावरण हा कार्यक्रम
लोकांना एकत्रित करत पार पडणे म्हणजे हा विवेकानंदांचे स्वप्न साकार करण्याचा एक
आगळा-वेगळा प्रयत्न आहे."
डॉ. विजय पी भाटकर ह्या प्रसंगी
म्हणाले , "श्रीमद भगवत गीता ध्यान भवन आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितल्या
गेलेल्या अमर सत्याचे एक प्रतीक आहे. हे एक असे शास्त्र आहे जे फक्त आपल्याला
जीवनात मार्गर्शनच नाही तर विभिन्न धर्माच्या रूढी-परंपरांबद्दल विस्तारित माहिती
देते." सध्या डॉ. भाटकर भारतासाठी एक्सास्केल सुपर कम्प्युटिंग मिशनाच्या
विकासामध्ये व्यस्त आहेत.
No comments:
Post a Comment